तहसीलदारां समवेत केली खाजगी सेंटरची पाहणी
तहसीलदारांचे चौकशी करण्याचे आश्वासन
येथील एका खाजगी कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर नसताना देखील व्हेन्टिलेटरचे बिल आकारल्याने आज मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत तहसीलदारांसमवेत त्या खाजगी सेंटरला धडक दिली. यावेळी तहसीलदार यांनी त्याठिकाणी पाहणी करत संपूर्ण माहिती घेतली त्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयाची देखील पाहणी करण्यात आली.
येथील शहरात राहणाऱ्या एका कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा स्कोर 20 वर गेल्याने त्याची ऑक्सिजनची लेव्हल खालावली होती. त्यासाठी त्याला वेंटीलेटरची गरज होती ते येथील एका खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचार घेत होते. ऑक्सिजन लेव्हल खूपच खालावल्याने अखेर त्यांना त्या ठिकाणाहून हलवण्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून त्या एका रात्रीचे 23 हजार बिल आकारण्यात आले. बिल अदा केल्यानंतर त्याठिकाणावरून डिस्चार्ग देऊ असे सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब 23 हजार रुपयांची सोय करून बिल अदा केले. तेथून त्यांनी गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले मात्र ते मरणाच्या स्थितीत जाऊन पोहचल्याने अखेर मग बांबोळी येथील रुग्णालयात तब्बल 15 दिवस उचारानंतर देण्यात आले त्यानंतर ते बरे झाले बरे होऊन घरी परतल्यानंतर त्यांच्या पत्नींनी सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेते वेळेस व्हेंटिलेटर चे बिल आकारल्याचे लक्षात येताच त्यांनी मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांना संपर्क करत सारी हकीकत सांगितली.
उपरकर यांनी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार जिल्हा कार्यअध्यक्ष संतोष भैरवकर यांना हा सर्व प्रकार सांगून उघडकीस आणून देण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार आज मनसे पदाधिकारी माझी जिल्हा उपाध्यक्ष ॲड अनिल केसरकर परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड राजू कासकर, उपतालुका अध्यक्ष श्री सुधीर राऊळ, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सचिव विठ्ठल गावडे यांनी प्रकाराबाबत तहसीलदार श्री म्हात्रे याची भेट घेतली.
त्या कोविड रुग्णासोबत घडलेल्या सर्व प्रकारची हकीकत त्यांना सांगितली श्री म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत ताबडतोब त्या खाजगी कोविद सेंटरला भेट दिली त्याठिकाणी जात मनसेच्या 2 पदाधिकाऱ्यांसोबत त्या सेंटरची पाहणी केली मात्र त्या सेंटरमध्ये बॉयपॅक मशीन आढळून आली या प्रकारची उद्या सायंकाळ पर्यंत चौकशी करणार असल्याचे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले
त्या रुग्णाच्या घरच्यांशी केलेल्या चर्चे नंतर त्या कुटुंबाचा धान्याचा सर्व खर्च मनसे उचलणार असल्याचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी सांगितले तर त्यांचा वैद्यकीय खर्च तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उचलण्याचे ठरविले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ तालुका सचिव विठ्ठल गावडे परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर आदी उपस्थित होते