You are currently viewing सातार्डा परिसरात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास टॉवरवर चढून आंदोलन

सातार्डा परिसरात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास टॉवरवर चढून आंदोलन

भाजप पदाधिकाऱ्यांचा इशारा; जिल्हा प्रबंधकांना निवेदन सादर

सावंतवाडी
सातार्डा व साटेली परिसरातील बीएसएनएलच्या समस्यांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीच्या बीएसएनएल कार्यालयात धडक देत जिल्हा प्रबंधकांशी चर्चा करत निवेदन सादर केले. दहा दिवसात सेवा पूर्ववत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करू असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, आठ ते दहा दिवसात बीएसएनएल टॉवरची सेवा पूर्ववत करू असे आश्वासन जिल्हा प्रबंधक देशमुख यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानदिप राऊळ, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, सातार्डा शक्तीप्रमुख रवि धुपकर, गोविंद प्रभू, किरण प्रभू आदी उपस्थित होते.

सातार्डा तसेच साटेली परिसरात वर्षभरापासून बिसएनएलची सेवा खंडित आहेत. सद्य स्थितीतही ही सेवा पुर्णपणेच ठप्प आहे. त्यामूळे सध्या कोरोना काळात सुरु असलेले ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन काम तसेच लसीकरण माहीती कींवा रजिस्ट्रेशन तसेच अन्य कार्यकालीन कामकाज याचबरोबर निदान काॅल कर ण्यासाठी आवश्यक नेटवर्कचीही वानवा असल्याने संतप्त स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी सावंतवाडीतील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाला धडक देत जिल्हा प्रबंधक देशमुख यांना निवेदन सादर केले.

यावेळी सविस्तर चर्चेअंती आठ ते दहा दिवसात टाॅवरसेवा व्यवस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ही सेवा आठदहा दिवसात सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्टला टाॅवरवर चढुन आंदोलन केल जाईल असा सज्जड इशाराच यावेळी देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा