You are currently viewing उदघाटनाआधी चिपी विमानतळाला पायाभूत सुविधा पुरवा!

उदघाटनाआधी चिपी विमानतळाला पायाभूत सुविधा पुरवा!

मालवणकडील जोडरस्ते तातडीने करा

कोकण हायवे समन्वय समिती समन्वयक, उद्योजक डॉ. दीपक परब यांची मागणी

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या चिपी विमानतळाबाबत गेली दोन वर्षे चतुर्थी जवळ आली की विमान सेवा सुरू होणार अश्या प्रकारची वक्तव्ये जिल्ह्यातील सत्तारूढ आमदार, पालकमंत्री आणि शिवसेना खासदारांकडून केली जात आहे. दोन दिवसापूर्वीच खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाला भेट देऊन गणेश चतुर्थीला प्रवाशी विमान सेवा सुरू होणार असे जाहीर केले चतुर्थी पूर्वी विमानसेवा सुरू होण्याच्यादृष्टीने परवानग्या ही मिळतील परंतु विमानतळाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे विमानतळाकडे जाणारे अप्रोच रस्ते, वीज या पायाभूत सुविधांची योग्य ती पूर्तता झालेली नाही या सुविधांची पूर्तता होण्याच्यादृष्टीने खासदार राऊत यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी कोकण हायवे समन्वय समितीचे समन्वयक आणि उद्योजक डॉ. दीपक परब यांनी व्यक्त केले आहेत.

दोन दिवसापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाला भेट देऊन गणेश चतुर्थीच्या वेळी चिपी विमानतळ सुरू होईल असे पत्रकारांना सांगितले होते. त्यावर डॉ.दीपक परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डॉ.दीपक परब यांनी म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीच्या आधी चिपी विमानतळा वरून प्रवासी विमान सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. वस्तुतः मालवणहून विमानतळाकडे जाणारा अप्रोच रस्ता हा अरुंद आणि खड्डेमय असा आहे आजही या रस्त्याचा प्रश्न मिटलेला नाही तर मालवण , देवगड,कणकवली, वैभववाडी येथील लोकांना चिपी विमानतळाकडे जायचे असेल तर चिपी विमानतळाला दोन ते चार किलोमीटरचा फेरा मारून परुळे येथून जावे लागणार आहे म्हणजेच हा पैशाचा तसेच वेळेचा अपव्यय होणार आहे.

म्हणून विमानतळाकडे जाणारा रस्ता हा मालवणच्या बाजूने थेट असणे गरजेचे आहे तसेच मालवण प्रमाणे कुडाळ येथूनही विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न हा गंभीर आहे. हे प्रश्न निकाली होणे गरजेचे आहे पायाभूत सुविधाची जर वानवा असेल तर ते सर्वांच्या दृष्टीने त्रासदायक ठरणारे आहे खासदार राऊत हे नगरसेवक पदापासून खासदार पदापर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्त्व आहे त्याचप्रमाणे ते खासदार या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्याने या सर्व बाबींचा विचार करूनच विमान सेवेबाबत वकव्य करावे असेही डॉ. परब यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा