वेंगुर्ला येथील नगरपालिका आणि “वी फाॅर यू” संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “एक घर,एक रोप’ हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी घरोघरी जाऊन इच्छूक व्यक्तिंना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले.दरम्यान याला नागरिकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून याच माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला कॅम्पच्या परिसरात वृक्षारोपण करून, या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.या वेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा सौ.अस्मिता राऊळ, नगरसेवक श्री. प्रशांत आपटे, मुख्याधिकारी श्री.अमितकुमार सोंडगे,सहाय्यक कार्यालय अधीक्षक व प्रभारी स्वच्छता निरीक्षक श्री. वैभव म्हाकवेकर, वी फाॅर यू संस्थेचे अध्यक्ष ॲड.संकेत नेवगी, उपाध्यक्षा संपदा तुळसकर, सचिव ॲड. स्वप्निल कोलगांवकर,खजिनदार मिहीर मोंडकर, इव्हेंट हेड ॲड.दत्तप्रसाद नाटेकर,सदस्या अॅड.सायली चव्हाण, अॅड.श्रद्धा राऊळ, दीप्ती पंडित, अनमोल गिरप,आरती गिरप, तनया गिरप,नवोदित आजगावकर,आशुतोष करंगुटकर, प्रसाद बाविसकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. नगराध्यक्ष यांनी वी फाॅर यू संस्था आदर्शवत कार्य करत आहे, युवा पिढी ही देशाची संपत्ती आहे, असेच कार्य करत रहा, युवकांना संघटित करा, असे प्रोत्साहन दिले तसेच मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी देखील संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. स्वप्निल कोलगांवकर यांनी तर आभार संपदा तुळसकर यांनी मानले.