बावशी महीला बचत गटाचे आमरण उपोषण मागे
कणकवली
कणकवली तालुक्यातील बावशी जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गट यांनी बावशी गावाला स्वतंत्र मिळणारे रेशनिंग दुकानासाठी गेल्या वर्षी प्रस्ताव पुरवठा विभागाजवळ सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कालांतराने त्यांनी प्रस्ताव रद्द केल्याने सदर बचत गटाने पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी नायब तहसीलदार सुजाता पाटील यांच्या लेखी आश्र्वासनाने मागे घेण्यात आले आहे .
रेशनिंग दुकानासाठी पुन्हा अर्ज दाखल करावा तेव्हा विचार केला जाईल असे यावेळी आश्वासन दिले यावेळी. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, मिलिंद मेस्त्री,राजन चिके , असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर,संतोष मिराशी , योगेश सदडेकर , सानिका गावडे, दिनेश , विलास कांडर,गौरवी बोभाटे, गंगाधर बोभाटे , तसेच गटविकास अधिकारी अधिकारी अरुण चव्हाण, पुरवठा अधिकारी ममता तांबे, विस्तार अधिकारी सुनील पांगम, तलाठी सुर्दशन अलकुटे , ग्रामसेवक युवराज बोराडे उपस्थित होते. या ठिकाणी जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता नाही तसेच इतरांना दुर जावं लागणार म्हणून त्यांनी दुसरी जागा दाखविण्यात सांगितले होते परंतु या दोन ते तीन महिने कालावधीत कोरोनाचा प्रादूर्भाव एवढा मोठा होता की बचत गटाच्या महिला कोरोना बाधीत होत्या यामुळे आम्ही या काळात कुठे जावू शकलो नाही आणि याच कालावधीत पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.
या विरोधात कालपासून उपोषणाला सुरुवात झाली होती .बचतगट प्रमुख स्नेहलता कांडर व इतर महीला उपस्थित होत्या. यावेळी पुरवठा विभागाने दिलेल्या आश्वासनामध्ये १ एप्रिल २०२१ च्या पत्र्याने बचत गटाच्या प्रमुख यांना कळविले होते की, जागेची उपलब्धता करून संपर्क साधावा परंतु या काळात संपर्क न केल्याने आपला प्रस्ताव निकाली काढण्यात आला होता . तथापि आपण या रेशनिंग दुकानासाठी पुन्हा अर्ज दाखल करावा तेव्हा विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.या आश्र्वासनाने उपोषण मागे घेण्यात आले आहे. गावच्या सरपंच मनाली गुरव , उपसरपंच , रविंद्र बोभाटे ,. पोलिस पाटील विजय मोरये, पांडुरंग मयेकर , बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. .