You are currently viewing पंकजा मुंडे दिल्लीला रवाना, मोठी घडामोड घडण्याची शक्यता

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना, मोठी घडामोड घडण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात  बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे  या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे आज सकाळी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच पंकजा दिल्लीत पोहोचणार आहे. नियोजित बैठकांसाठी जात असल्याचं पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. पण प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं उघड झालं आहे.

आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल होणार आहे.  कार्यकर्त्यांची नाराजी आणि प्रीतम मुंडे न मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल दिल्लीतील नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बीडमध्ये 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. या नाराजी नाट्याची लाट आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचली आहे. पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.   प्रीतम मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश न करण्यात आला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून आपण राजीनामा दिला असं कायंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी आपला राजीनामा पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊसेठ रासकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा