प्रतिबंधात्मक एक लस घेतल्यावरही प्रवेश
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेले सर्व चेक नाके खुले करण्याचे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. Covid-19 प्रतिबंधात्मक दोन लस घेतल्यावरच गोव्यात प्रवेश देण्यात येत आहे, मात्र आता एक लस घेतल्यावरही प्रवेश देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
महाराष्ट्र राज्य शिवशंभु संघटनेच्या सिंधुदुर्ग वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात आले. तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पण दिले. शिवशंभु संघटनेचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष समीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदूर्ग जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष यामेश्वर कवठणकर, तसेच सदस्य उमेश मांजरेकर, वैभव चोडणकर उपस्थित होते.