You are currently viewing राणेंना मंत्रीपद; सिंधुदुर्गात सेना अलर्ट

राणेंना मंत्रीपद; सिंधुदुर्गात सेना अलर्ट

आमदार केसरकरना कुणी केलं सक्रिय?

ओरोस :

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यावर, त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढल्याने सेनेतील मरगळ झटकण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी ओरोस येथील आपल्या संपर्क कार्यालयात सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ओरोस येथील संपर्क कार्यालयात भेटीगाठी घेणार असा हा नियोजित कार्यक्रम होता.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागल्याने कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेनेला धक्का बसू नये यासाठी मातोश्री वरूनच सैनिकांना सांभाळा असे आदेश प्राप्त झाल्याचे कळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा