– गणेश वाईरकर, मनसे माजी तालुकाध्यक्ष मालवण
केंद्रात नारायण राणे याना मंत्रीपद मिळाले म्हणून सेना जिल्ह्यात अजुन एक आपल्या आमदाराला मंत्रीपद देऊ करत आहे… पण जिल्ह्याच्या वाट्याला काय येणार… सेना आणी बिजेपी च्या भांडणात जिल्ह्याला काय मिळणार? आज जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे अद्याप पुर्ण झाली नाही. अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. आणि आमचे खासदार विमानतळ सुरु करण्याच्या नविन नविन घोषणा करताहेत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आज व्हेंटीलेटर वर आहे त्याची कोणाला काही फिकिर नाही.. म्हणून मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी व्हावा.
नारायण राणे यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी होईल. आणि जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी यांना जिल्ह्याबाहेर म्हणजे नजिक असलेल्या गोवा राज्यात नोकरी साठी जावं लागू नये अशी अपेक्षा गणेश वाईरकर, मनसे माजी तालुकाध्यक्ष मालवण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.