You are currently viewing राणेंना शुभेच्छा देताना, वाढती महागाई कमी व्हावी अशी व्यक्त केली अपेक्षा

राणेंना शुभेच्छा देताना, वाढती महागाई कमी व्हावी अशी व्यक्त केली अपेक्षा

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांची पत्रकार परिषद

सावंतवाडी :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. वाढत्या महागाईमुळे जनता होरपळली आहे. वाढते पेट्रोल, डिझेल, सिलेंडर गॅस यांचे दर कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी प्रश्नोत्तरादाखल व्यक्त केली आहे.

महागाई विरोधात आज सिंधुदुर्गात जिल्हा काँग्रेस निदर्शने करणार होती. जमावबंदी आदेशामुळे आजची निदर्शने स्थगित करण्यात आली. ही माहिती देण्यासाठी बाळा गावडे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद बोलवली होती.

यावेळी महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सौ साक्षी वंजारी, प्रवक्ते इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष महेश सांगेलकर, समीर वंजारी, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा