दोडामार्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्ष पदी कृष्णा उर्फ उल्हास यशवंत नाईक यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरी जगन्नाथ तथा बाळ कनयाळकर यांनी नियुक्ती करत तसे नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते दिले.
श्री.नाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यानी पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांच्या समास्य मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. सुरेश दळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
कृष्णा नाईक यांनी यापूर्वी पक्षासाठी दिलेल्या योगदान लक्षात घेऊन ही जबाबदारी दिली त्यांचावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरी जगन्नाथ तथा बाळ कनयाळकर यांनी ही नियुक्ती केली.
यावेळी तालुका अध्यक्ष महादेव बोर्डेकर, सुदेश तुळसकर, प्रदीप चांदेलकार, संदीप गवस, सुशांत राऊत, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.