कुडाळ
वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळ पुर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न साकार करणारे खासदार विनायक राऊत माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री ना उदय सामंत, आमदार वैभव नाईक हे जनतेच्यावतीने आणि शिवसेनेच्या वतीने आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले.
आज चिपी विमानतळ बाबत आढावा घेण्यासाठी खासदार विनायक राऊत माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर चिपी येथे बैठक घेऊन एकंदरीत संपूर्ण कामाची माहिती घेतली. यावेळी श्री बंगे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुषणावह असलेल्या चिपी विमानतळ पुर्णत्वास नेण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या सह दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न झाले म्हणून आज हा विमानतळ पुर्णत्वास जात असताना शिवसेना नेतृत्वाचा आभार मानले जात आहेत असे सांगून बंगे म्हणाले अनेक अडचणी वर मात करत असताना विरोधकांच्या टिकेला सुध्दा सामोरे जात असताना जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हा एवढा मोठा प्रकल्प पुर्णत्वास नेला जात आहे, याचा आम्हाला शिवसैनिकांना अभिमान आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, शिवसेना जि प गटनेते नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, युवासेनेचे रोहीत म्हापणकर, पाट सरपंच प्रिती राऊळ, पाट शिवसेना उपविभाग प्रमुख महेश वेळकर, युवासेना कुडाळ शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना कुडाळ शहर समन्वयक अमित राणे, कुडाळ तालुका मागासवर्गीय तालुका प्रमुख भुपेश चेंदवणकर, युवासेनेचे साईश घुर्ये, बंड्या कोरगावकर, खासदार विनायक राऊत यांच्या कन्या कु रुची राऊत व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.