You are currently viewing भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पसमध्ये सुयश

भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पसमध्ये सुयश

माहले-आनंद थर्मल सिस्टम्स, चेन्नई करिता 7 विद्यार्थ्यांची निवड

सावंतवाडी

देशाच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील थर्मल मॅनेजमेंट सिस्टमसाठी विख्यात कंपनी माहले-आनंद थर्मल सिस्टम्सच्या चेन्नई येथील उत्पादन प्रकल्पासाठी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 7 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.

कॉलेजच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून निवड झालेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे – तेजस राऊळ, भुवन राऊळ, ऋषिकेश राणे, अनिकेत गवस, सर्वेश धुरी, विठ्ठल रासम, विराज धुरी.

स्टुटगार्ट, जर्मनी येथे मुख्यालय असलेल्या माहलेची सुमारे 34 देशांमध्ये 170 ठिकाणी उत्पादन केंद्रे आहेत. तसेच 16 ठिकाणी रिसर्च डेव्हलपमेंट केंद्रे आहेत. ऑटोमोटिव्ह एअर कंडिशनिंग आणि इंजिन कूलिंग सिस्टमचे विशेष निर्माता म्हणून कंपनीचा जगभरात दबदबा आहे. भारतात आनंद ग्रुपबरोबर या कंपनीची भागीदारी असून चेन्नईसॊबतच पुणे येथेही उत्पादन प्रकल्प कार्यरत आहे..
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा