देशातील आठ राज्यातील कराटे खेळाडुंचा सहभाग
तळेरे
कराटे डो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व कराटे असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महापौर चषक चॅम्पियनशिप आॅनलाईन पध्दतीने काता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.१२वी मधील रोहन संतोष राठोड याने मुलांच्या खुल्या गटात प्रथम क्रमांक तर याच विद्यालयातील इ.१०वी मधील कु.सानिका दत्तात्रय मारकड हिने १६वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
याशिवाय कासार्डे माध्यमिक विद्यालयातील कराटे पट्टू कु.सीमा रमेश राठोड- (इ.११वी) हिने द्वितीय क्रमांक,युवराज संजय राठोड (इ.१०वी) याने द्वितीय क्रमांक व पार्थ प्रकाश पाटील(इ.१०वी) याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या यशस्वी खेळाडूंना कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या आॅनलाईन कराटेतील काता चॅम्पियनशिप सन २०२१/२२ या स्पर्धेला महाराष्ट्र राज्यासह झारखंड, मध्यप्रदेश,प.बंगाल, कर्नाटक,केरळ, आंध्रप्रदेश व दिल्ली आठ राज्यातील खेळाडुनी सहभाग घेतला होता.
कणकवली तालुक्यातील कासार्डे हायस्कूलच्या खेळाडूंनी यापूर्वी या खेळाडूंनी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय कराटेमधील कुमेते व काता प्रकारात यश संपादन केले आहे.हे यशस्वी सर्व खेळाडू गेली पाच ते सहा वर्ष कराटे खेळाचा नियमित सराव करीत आहेत.
या यशस्वी खेळाडूंना आयडियल ज्युदो कराटे जिल्हा असोसिएशनचे जिल्हा मुख्य प्रशिक्षक व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच कासार्डेतील कराटे असोसिएशनच्या सर्व कराटे प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या यशस्वी खेळाडूंचे मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सल्लाउद्दीन अन्सारी, संघटनेचे सचिव शिहान संदीप गाडे, सेन्साई राजेश गाडे, खजिनदार सेन्साई संदीप वाघचौरे मुंबई कराटे असोसिएशनचे सचिव अरविंद चव्हाण तसेच कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर,मानद सरचिटणीस उपेंद्र पाताडे व सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी तसेच स्कुल कमिटी चेअरमन तथा विद्यालयाचे प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
१.रोहन राठोड
२कु.सानिका मारकड
३.कु.सीमा राठोड
४.युवराज राठोड
५.पार्थ पाटील