You are currently viewing मनाच्या गुजगोष्टी

मनाच्या गुजगोष्टी

वाटते कधीतरी मनास स्वतःच्याच सांगावे…
जा कुठेतरी भटकून ये,
नको राहुस कोंडून
या छाताडाच्या आत,
भावना तुझ्या दडतील
त्या भयाण काळोखात,
स्वच्छंदी विहार कर
चांदण्यांच्या घोळक्यात,
नको लपवून ठेऊ तू
गुपित आतल्या कप्प्यात,

वाटते कधीतरी मनास स्वतःच्याच सांगावे…
जा तू उंच झेप घे,
जाळून सगळी दुःख तुझी
शीर सुखाच्या हृदयात,
वेडेपणा सोड अन, नाच
तू स्वतःच्याच तालात,
हसतील लोक ठेवतील नावं
नको राहू तू शरीराच्या प्रेमात,
श्वास कोंडेल तुझा या
आशेवर जगणाऱ्या जीवनात,

वाटते कधीतरी मनास स्वतःच्याच सांगावे…!!!
जा तू तुझं जीन जग
नको पाहुस कधी डोळ्यात,
अन मागेही वळू नकोस
पाहण्या का ते वाहतात,
तरारलेलं पाणी डोळे
आतल्या आत गोठवतात,
आतुरलेल्या नजरेने तुझी
पाहतील ते रोज वाट,
कधी येशील लेवून तू
सुंदरसा, एक नवा थाट,

वाटते कधीतरी मनास
स्वतःच्याच सांगावे…

दिपी…!!
दीपक पटेकर,
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा