You are currently viewing थोड्याच वेळात होणार खा.नारायण राणे यांचा शपथविधी

थोड्याच वेळात होणार खा.नारायण राणे यांचा शपथविधी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार नारायण राणे यांची वर्णी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत विध्यमान मंत्री आणि मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांसमवेत झालेल्या बैठकीत खासदार राणेंना पहिल्या रांगेत स्थानदेण्यात आले होते. म्हणजेच तेव्हड्यात दर्जाचे मंत्रिपद राणेंना दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

राज्यातील शिवसेनेला कडवा विरोध करणारे खा.राणे यांना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेनेला शह दिला जाणार आहे.त्यामुळे राज्यात व कोकणात भाजपाला मोठी ताकद मिळणार आहे.नेमके कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत काही वेळातच जाहीर होणार आहे.मात्र कोकणातील भाजपा कार्यकत्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा