अखेर बहुप्रतिक्षित जेईई मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याची घोषणा केली. यानुसार जेईईची तिसऱ्या टप्प्यातील मुख्य परीक्ष 20 ते 25 जुलै दरम्यान होणार आहे. याशिवाय चौथ्या टप्प्यातील परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2021 दरम्यान होईल.
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसरे टप्प्यात परीक्षेसाठी अर्ज न करु शकणाऱ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात अर्ज करता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) ही परीक्षा आयोजित केली जाते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुसरी लाटेचा धोका लक्षात घेऊन JEE Main परीक्षेचा तिसरा आणि चौथा टप्पा स्थगित करण्यात आला होता. आता या निर्णयाने या परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही त्यांना 6 जुलै ते 8 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी 9 जुलै ते 12 जुलै 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जेईई मेन परीक्षा 4 वेळा आयोजित केली जाणार आहे. यापैकी ज्या परीक्षेचा निकाल चांगला असेल तो निकाल गृहित धरला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलायचे त्यांना 6 ते 8 जुलै दरम्यान लॉग इन करता येणार आहे.