वैभववाडी
तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना लुपिन फाऊंनडेशन यांच्या मार्फत थर्मल गन, आँक्सीमीटर व पीपीई किट वाटप करण्यात आले. नाधवडे, कोकीसरे व मांगवली या तीन ग्रामपंचायतीना हे साहित्य देण्यात आले.
कोरोना काळात लुपिन फाऊंनडेशन या सामाजिक संस्थेमार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.गरजूंना अन्नधान्य वाटप, मास्क वाटप, शिक्षण संस्थांना वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले होते. लुपिन फाऊंनडेशन मार्फत तालुक्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील नाधवडे, कोकीसरे, मांगवली या ग्रामपंचायतींना हे साहित्य संस्थेमार्फत पुरविण्यात आले. यामध्ये थर्मल गन, आँक्सीमीटर व पीपीई किट यांचा समावेश आहे. या तीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हे साहित्य स्वाधीन करण्यात आले.
यावेळी कोकीसरे सरपंच दत्ताराम सावंत, नाधवडे उपसरपंच सुर्यकांत कांबळे, मांगवली उपसरपंच शिवाजी नाटेकर,ग्रा. प. सदस्य महेश संसारे, प्रफुल्ल कोकाटे, लुपिन फाऊंनडेशनचे प्रविण पेडणेकर, चंद्रकांत म्हापणकर उपस्थित होते..