You are currently viewing 13 MP कॅमेरा असलेलं पहिलं स्मार्टवॉच झालं लाँच

13 MP कॅमेरा असलेलं पहिलं स्मार्टवॉच झालं लाँच

मिळतोय 5 हजार रुपयांचा डिस्काउंट 28 जुलैपर्यंत

 

आजच्या दुनियेत ‘स्मार्ट’ उपकरणांना जास्त वाव आहे. स्मार्ट फोन्सचा ‘स्मार्ट’ पणा दिवसेंदिवस वाढतोच आहे. अश्यातच स्मार्ट वॉचेस मध्येही अधिकाधिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कॉस्पेट  कंपनीने Optimus 2 हे आपलं स्मार्टवॉच जगभरातल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध केलं आहे. हे नवं स्मार्टवॉच अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर  विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यात अनेक सुविधा आहेत. या स्मार्टवॉचच्या डायलवर एक फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. त्यातल्या बॅटरीची क्षमता 1260 mAh एवढी आहे. AliExpress या प्लॅटफॉर्मवर या स्मार्टवॉचची किंमत 18,628 रुपये एवढी आहे. ग्राहकांनी 333OPTIMUS2 हा कुपन कोड वापरला तर तेच स्मार्टवॉच ग्राहकांना 13,190 रुपयांना उपलब्ध होऊ शकतं. ग्राहकांसाठी डिस्काउंटची ही खास ऑफर 28 जुलैपर्यंतच उपलब्ध असेल.

कॉस्पेट कंपनीच्या ऑप्टिमस या स्मार्टवॉचला 1.6 इंचांचा IPS राउंड डिस्प्ले आहे. त्यात मेटॅलिक बेझेल देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे, की फ्लॅशलाइटसह (SONY IMX214) 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा या स्मार्टवॉचला आहे. अशा प्रकारचा कॅमेरा असलेलं हे जगातलं पहिलं स्मार्टवॉच (Smartwatch with Camera) आहे. हा कॅमेरा वॉचच्या वरच्या बाजूला देण्यात आला असून, तो 90 अंशांपर्यंत फिरवता येतो. या उत्तम कॅमेराचा उपयोग युझर्स व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी करू शकतात.

कंपनीने ऑप्टिमस टू या स्मार्टवॉचमध्ये MediaTek HelioP22 आणि PixArtPAR2822 अशा दोन चिपसेट्सचा वापर केला आहे. MediaTek HelioP22 हा चिपसेट प्रोसेसरप्रमाणे काम करतो. PixArtPAR2822 या चिपचा उपयोग ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि स्पोर्ट डेटासाठी केला जातो. दोन वेगवेगळ्या चिपसेट्समुळे या वॉचमध्ये ब्लूटूथ आणि सेल्युलर कनेक्शन दर्जेदार मिळतं. त्यामुळे बॅटरी जास्त काळ टिकते आणि बॅटरीचं एकंदर आयुष्यही वाढायला मदत होते.

या स्मार्टवॉचमध्ये लाइट मोड आणि अँड्रॉइड मोड असे दोन मोड्स देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये 1260mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर लाइट मोड वापरल्यास पाच दिवस, तर अँड्रॉइड मोड वापरल्यास दोन दिवस पुरते. या वॉचमध्ये 4GB LPDDR4 मेमरी चिप आणि 64GB EMMC 5.1 फ्लॅश मेमरी चिप देण्यात आली आहे. त्यांच्या साह्याने 3D गेम्स आरामात खेळता येतात. तसंच मोठ्या फाइल्स किंवा फोटोही त्यात स्टोअर करता येतात.

जवळपास सगळ्याच गेम्ससाठी यात 31 स्पोर्टस् मोड समाविष्ट करण्यात आले आहेत. तसंच या स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन VC32S हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, स्लिप ट्रॅकर आदी सेन्सर्सही देण्यात आले आहेत. कॉस्पेट कंपनीचं हे स्मार्टवॉच अँड्रॉइड 10.7 सिस्टीमवर काम करतं. ड्युएल 4G नेटवर्कला हे वॉच सपोर्ट करतं. या वॉचमध्ये ट्रिपल सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीमही देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा