You are currently viewing “आत्मनिर्भर भारत अभियान” अंतर्गत भाजयुमो सिंधुदुर्गची कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे विशेष बैठक संपन्न

“आत्मनिर्भर भारत अभियान” अंतर्गत भाजयुमो सिंधुदुर्गची कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे विशेष बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आत्मनिर्भर भारत अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानचे कोकण संयोजक मा. विनयजी सावंत यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला.

यावेळी कुडाळ एमआयडीसी विश्रांतीगृहावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजनजी तेली, जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीतजी देसाई, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर, जिल्हा पदाधिकारी राजू राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक संपन्न झाली. विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक तालुक्यात आत्मनिर्भर भारत अभियान मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ पोहोचेल यादृष्टीने विविध विभागांची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली.

दीर्घकाळ चाललेल्या या विशेष बैठकीला युवा मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या उर्फ श्रीपाद तवटे, बचत गटांच्या कामाची जबाबदारी असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानच्या जिल्हा संयोजिका सौ.रश्मी लुडबे, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील, राजेश पडते, नगरसेवक सुनिल बांदेकर, चेतन धुरी, साहसी पर्यटन क्षेत्रात काम करणारे डॉ.कमलेश चव्हाण, महेश हुले, मत्स्य उद्योजक राजेश साळगावकर, वेंगुर्ला युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद पाटकर,युवा परिवर्तन संस्थेचे दीपक कुडाळकर, कोकण एनजीओ फेडरेशनचे कार्याध्यक्ष तथा भाजपा मालवणचे माजी शहर अध्यक्ष भालचंद्र राऊत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे गव्हर्निंग कौन्सिल चंद्रशेखर पुनाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा