सावंतवाडी शहरातील भटवाडी येथे बहिर्वक्र आरसे बसविण्याची मागणी

सावंतवाडी शहरातील भटवाडी येथे बहिर्वक्र आरसे बसविण्याची मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील जुना थेटर समोरील मुख्य वळणावर अपघाताची शक्यता पाहता बहिर्वक्र आरसे बसविण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे.

सांगेलकर यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरात वाढते अपघात लक्षात घेता शहरात ज्या ज्या ठिकाणी अपघात क्षेत्र आहेत, त्या त्या ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्यात आले आहेत. शहरातील भटवाडी येथील जुना थेटर समोरील मुख्य वळणावर देखील अपघाताची शक्यता असल्याने याठिकाणीही बहिर्वक्र आरसे लावण्यात यावेत, अशी मागणी सांगेलकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा