सावंतवाडी
मुंबई येथील मंथन पब्लिसिटी लिमिटेड आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धेत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु निधी चंद्रकात बिले हिने प्रथम पटकाविला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कु. निधीने ‘व्यथा एका बापाची’ या कथेचे उत्कृष्ट सादरीकरण करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या कु निधीला वर्गशिक्षक अमित कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. निधी ही शासकीय ठेकेदार चंद्रकांत बिले तसेच सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका प्राची बिले यांची कन्या होत. या यशाबद्दल कु निधीचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत आणि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.