सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 वर्षेावरील वयोगटातील नागरिकांचे कोवॅक्सीन लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र सोमवार दि. 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 7 हजार 680 लसी उपल्बध असणार आहेत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत 45 वर्षा खालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थांना पाठविण्यात आलेली असून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तरी 45 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सदर लसीकरण सत्रादरम्यान उपलब्ध लसींची माहिती पुढीलप्रमाणे आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र निहाय पुढीलप्रमाणे लस उपलब्ध आहेत. वैभववाडी तालुक्यात वैभववाडी – 80, उंब्रड – 80, करुळ – 80, तिथवली – 80, कणकवली तालुक्यात खारेपाटण – 80, कासार्डे, फोंडा – 80, नडगिवे – 80, पियाळी – 80, नरडवे – 80, दिगवळे – 80, हरकुळ खुर्द – 80, शिरवळ – 80, हळवल – 80, जानवली – 80, बिडवाडी – 80, भारणी – 80, करुळ – 80, कणकवली कॉलेज – 160, देवगड तालुक्यात फणसगाव – 80, देवगड ग्रामीण रुग्णालय 160, गिर्ये – 80, पुराळ – 80, नाडन – 80, बापार्डे – 80, पाटगाव – 80, कोटकामते – 80, नारिंग्रे – 80, जामसंडे – 80, वरेरी – 80, तळवडे – 80, कुवळे – 80, मालवण तालुक्यात आचरा – 80, पेंडूर – कट्टा ग्रामीण रुग्णालय – 60, मालवण ग्रामीण रुग्णालय 160, निरोम – 80, रेवंडी – 80, वेराल – 80, देवबाग – 80, नांदोड – 80, पेंडूर – 80, हेदुळ – 80, वायंगवडे – 80, काळसे – 80, कुडाळ तालुक्यात जिल्हा सामान्य रुग्णालय – 160, ग्रामीण रुग्णालय कुडाळ – 160, कुपवडे – 80, घोडगे – 80, कुंदे – 80, अंब्रड – 80, सरंबळ – 80, बांबुळी – 80, केरवडे तर्फ माणगाव – 80, मंडकुली – 80, निवजे – 80, अकेरी – 80, गोवेरी – 80, नेरुर – 80, वेंगुर्ला तालुक्यात रेडी 80, ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला -160, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा – 60, परुळे बाजार – 80, निवती – 80, आडेली – 80, पालकरवाडी -80, तुळस – 80, मातोंड – 80, सागरतिर्थ -80, शिरोडा ग्रामपंचायत – 100, सावंतवाडी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी – 160, सोनुर्ली – 80, साटेली – 80, कलंबिस्त – 80, कारिवडे – 80, तळवडे 2 -80, नेमळे – 80, फणसवडे – 80, ओवळीये – 80, इन्सुली – 80, रोनापाल – 80, दोडामार्ग तालुक्यात तळकट -80, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग – 160, पाल पुनर्वसन – 80, पिकुळे – 80, अंबेली – 80, डिगवे – 80, कुंब्रल – 80 अशा एकूण 7 हजार 680 लसी उपलब्ध असणार आहेत.