You are currently viewing सिंधुदुर्गात पुन्हा एकदा १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावा

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावा

सिंधुदुर्ग महिला शिवसेनेची मागणी.

सिंधुदुर्ग:

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुन्हा एकदा १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा,अशी मागणी महिला शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले असून १७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत काही सण-उत्सव नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, मंगल ओरोसकर, ओरोस सरपंच प्रीती देसाई, ओरोस उपसरपंच मनस्वी परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 11 =