सावंतवाडी
पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल, गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे दरवाड कमी करण्याबाबतच निवेदन दिले. तहसिल कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी केंद्र सरकारच्या हाती सत्ता आल्यापासून सातत्याने इंधन दरवाढ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांचा जगण्याचा अधिकार काढून घेत आहे. कोरोना, टाळेबंदी यामुळे आधीच ल़ोकांचे रोजगार, उद्योग बंद आहे. त्यात पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल, गॅस दरवाढीमुळे जगणं कठीण झालंय असा हल्लाबोल राष्ट्रवादीचा पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, रोहीणी सावंत, अन्सारीन मकानदार, अंकीता देसाई, जहिरा ख्वाजा, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, संदीप राणे, बावतीस फर्नांडिस, सुर्यकांत नाईक, राजू धारपवार, अर्षद बेग, इफ्तिकार राजगुरू, नंदू साटेलकर, नंदकिशोर नाईक, आसिफ ख्वाजा, मोहिनी देऊलकर, कांचन मसुरकर, स्मिता मुळीक, आदी उपस्थित होते.