You are currently viewing दार्जिलिंग दुबई कोअर टिम, सुजाता सेत्या ऑफ मिशन यांच्या सौजन्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला कॉन्संट्रेटर सुपूर्द 

दार्जिलिंग दुबई कोअर टिम, सुजाता सेत्या ऑफ मिशन यांच्या सौजन्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला कॉन्संट्रेटर सुपूर्द 

कणकवली
दार्जिलिंग दुबई कोअर टिम, सुजाता सेत्या ऑफ मिशन यांच्या सौजन्याने येथील उपजिल्हा रुग्णालयाला 10 लिटर क्षमतेचे ऑक्सीजन कॉन्संट्रेटर देण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांद शिकलगार यांच्याकडे कॉन्संट्रेटर सुपूर्द करण्यात आले.
कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या समस्यांबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांच्यासह डॉ. अपर्णा वाळंज, मकरंद सावंत यांनी दार्जिलिंग दुबई कोअर टिम, सुजाता सेत्या ऑफ मिशन आॅक्सिजन या संस्थांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार पाच कॉन्संट्रेटर रुग्णालयाला उपलब्ध झाले आहेत. याबाबत डॉ. शिकलगार यांनीही आभार मानले. दार्जिलिंग दुबई कोअर टिम हीभारतीय नागरिकांची दुबईमध्ये वास्तव्यास असलेली संस्था आहे. संस्थेने लॉकडाऊनच्या काळातही अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
सदरची मदत सुपूर्द करतेवेळी नगराध्यक्ष नलावडे यांच्यासह माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चौगुले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा