सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 16.65 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1118.087 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 25(1219), सावंतवाडी – 20(1380.1), वेंगुर्ला – 28.2(880.6), कुडाळ – 12(992), मालवण – 30(1075), कणकवली – 06(1247), देवगड – 09(923), वैभववाडी – 03(1228), असा पाऊस झाला आहे.