सावंतवाडी
मळेवाड -महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने सिंधुदुर्ग सुपुत्र तथा उपसरव्यवस्थापक सुबोध मोरये यांच्या सौजन्याने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांला 200 मास्क व 50 फेस शिल्ड दत्तात्रेय साबाजी ठाकूर यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. पावसकर,आरोग्य सेवक जे.टी.राणे, लिपिक मनोज सातार्डेकर आदी उपस्थित होते.