बांदा
जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात झाडांची रोपे लावून व शाळा परिसरातील झाडांचा वाढदिवस साजरा करुरून कृषीदिन साजरा करण्यात आला.
दरवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
पर्यावरणात झाडांना अनन्यसाधारण महत्व आहे यासाठी या दिवसाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच या दिवशी शाळेच्या परिसरात यापूर्वी लावलेल्या झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या परिसरातील झाडांचे यावेळी औक्षण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी .पाटील ,मुख्याध्यापक सरोज नाईक, केंद्र प्रमुख संदीप गवस, पदवीधर शिक्षिका उर्मिला मौर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शिरोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील, रंगनाथ परब, शितल गवस यांनी परिश्रम घेतले.