संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे परंपरेनुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी अर्थात शुक्रवारी आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोजकेच वारकरी आणि मानक-यांना परवानगी देण्यात आली आहे. पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट विकास ढगे – पाटील म्हणाले की, शासनाच्या निकषांच्या अधीन राहून प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर माऊलीच्या पादुका सोमवार पर्यंत देऊळवाड्यात दर्शन बारी मंडपामध्ये राहतील.