You are currently viewing पाल येथे १५ बेडच्या विलगीकरण कक्षाचा लोकार्पण

पाल येथे १५ बेडच्या विलगीकरण कक्षाचा लोकार्पण

“कोविड योद्धे” यांचाही ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

वेंगुर्ला
पाल ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्य १५ बेडच्या विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.
या कक्षासाठी आमदार दीपक केसरकर व पाल गावातील तरुण उद्योजक अंकुश गावडे यांनी प्रत्येकी ५ बेड, भाऊ गावडे, अष्टविनायक मंगलमूर्ती मंडळ, खाजणवाडी ग्रामस्थ यांच्याकडून प्रत्येकी १ बेड तर खालचीवाडी, घाडीवाडी, मिरखोल, धाऊसवाडी, कांथरवाडी, कदमवाडी, देऊळवाडी मंडळ व वैयक्तिक देणगीदार यांच्याकडून २ बेड व इतर आवश्यक साहित्य देण्यात आले. लोकार्पण प्रसंगी सरपंच श्रीकांत मेस्त्री, उसरपंच मंगल गावडे, माजी सरपंच वासुदेव बर्वे, राजाराम गावडे, सदस्य संध्या गावडे, गीता नाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिपक गावडे, पोलिस पाटील रुतिका नाईक, सर्व मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, नारायण गावडे, दिलीप राणे, अनिल राणे, रमेश घाडी, अच्युत परब, संपदा पिगुळकर, रुचिरा पालकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
याच कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी वसंत तळकर, हर्षदा गवंडे, श्रीम. आजगांवकर व आशा स्वयंसेविका राजश्री पालकर यांचा ग्रामपंचायतीतर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन कोविड योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक गणेश बागायतकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा