यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक येथे शासकीय प्रवेश सुविधा केंद्र…
सावंतवाडी
राज्याच्या तंत्रशिक्षण विभागातर्फे दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (Diploma in Engineering)अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आज दि.30 जून पासून सुरू करण्यात आली आहे. विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया 23 जुलैपर्यंत चालेल. यामुळे दहावीच्या निकालापूर्वीच इच्छुक विद्यार्थ्यांना नावनोंदणी करून प्रवेश निश्चिती करता येणार आहे.
जाहीर वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची संकेतस्थळावरील ऑनलाइन नावनोंदणी व कागदपत्रे अपलोड करणे 30 जून ते 23 जुलै, कागदपत्रांची छाननी व अर्ज निश्चिती 30 जून ते 23 जुलै, तात्पुरती गुणवत्ता यादी 26 जुलै, तक्रारींचे निरसन 27 ते 29 जुलै, अंतिम गुणवत्ता यादी 31 जुलै असे वेळापत्रक राहील.
येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठीचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग व करिअर संधी’ या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्हीही प्रकारे समुपदेशनाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकममध्ये सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यांना नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रीडीटीशन (एन.बी.ए.) मानांकन प्राप्त झाले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांमधून अशा प्रकारचे मानांकन प्राप्त करणारी ही पहिलीच तंत्रशिक्षण संस्था आहे. संस्थेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संपूर्णपणे मोफत शिक्षण उपलब्ध असून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50 टक्के फी सवलत उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश व समुपदेशन सुविधेचा लाभ घेण्यासाठी 02363-273535, 273456 किंवा 9421718850/9130003477 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे.