कुडाळ
मनसे चे गणेश कदम व धीरज परब यांच्या कडुन डिजिटल थर्मल गन, ऑक्सिमिटर, व स्टिमर कुडाळ पोलिस स्टेशन ला भेट देण्यात आले.
कुडाळ पोलिस स्टेशन मधील दहा कर्मचारी करोना पाॅजीटिव आल्या मुळे तात्काळ या वस्तु पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आल्या. पोलिस आपले कर्तव्य बजावत असताना सण, महामारी,आपत्कालीन परिस्थितीती याचा कधी विचार करत नाही. म्हणून सर्व सामान्य लोक सुरक्षित असतात. या करोना काळात देखील पोलिस कर्मचारी अविरत पणे सेवा बजावत आहेत. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे.
अशा परिस्थितीत दहा कर्मचारी व त्याचे कुटुंबीय करोना पाॅजीटिव आल्याची बातमी समजली. तात्काळ करोना प्रतिबंधक उपाय म्हणुन डिजिटल थर्मल गन, डिजिटल ऑक्सिमिटर, व स्टिमर पोलिस स्टेशन कुडाळ मध्ये उपलब्ध करुन दिले असल्याचे परब यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, शहर अध्यक्ष सिद्धेश खुटाळे, शहर सचिव रमा नाईक, उप तालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे, आदील शहा, प्रथमेश धुरी, विष्णू मस्के, समीर नाईक, साजन नायर उपस्थित होते.