You are currently viewing शब्द

शब्द

 

काहीवेळा काही पंक्ती सुचतात,
काही मनाला भावतात,
आणि,
काही शब्दरूपाने कागदावर उतरतात,,,
कुणाच्या पसंतीस पडतात,
कुणाला हिरमुसले करतात,
कुणाच्या हृदयात खोलवर रुततात,
तर
कुणाच्या हृदयाला स्पर्शून जातात,
कुणाला खळखळून हसवतात,
तर,
कुणाला आतल्या आत रडवतात,
कुणाच्या नजरेत चमक आणतात
तर,
कुणाला नजरेतून उतरवतात,,,,
कुणाच्या गाली हास्य खुलवतात,
कुणाचं हास्य हवेतच विरवतात,
का कुणास ठाऊक,,,
कसे शब्द एवढे मनाला भिडतात???

दिपी…!!
दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा