दोन्ही डोस घेतलेल्यांना जाण्याची मुभा द्या, शिवसेनेची मागणी…
सावंतवाडी
गोव्यात नोकरी किंवा अन्य कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली असेल, तर त्यांची पुन्हा आरटीसीपीआर तपासणीसाठी सक्ती करू जाऊ नये,अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.दरम्यान याकडे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असून यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती त्यांना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. याबाबत श्री राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सिंधुदुर्गातून गोव्यात नोकरीसाठी किंवा अन्य कामासाठी जाणाऱ्या येणाऱ्यानी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे.काहीनी दोन्ही डोस घेतले आहेत,अशा सर्वांना सवलत दिली जावी.त्यांना रॅपिड किंवा आरटीसीपीआर टेस्टची सक्ती केली जाऊ नये.त्यासाठी कोविड नियमावलीचे पालन करण्याची सक्ती केली जावी, मात्र टेस्टची सक्ती केली जाऊ नये, असे म्हटले आहे.