गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भाव व आताचे ताजे “तौक्ते”वादळ या दोन्ही नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील पर्यटन व्यावसायिक उध्वस्त झाला आहे. कोरोना नियमावली मुळे गेले दीड ते दोन वर्ष पर्यटक सागरी पर्यटनासाठी या भागात येत नसल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून आलेले घरगुती व व्यावसायिक लाईट बिल भरणार कुठून हा महागंभीर प्रश्न पर्यटन व्यावसायिकां समोर ठाकला आहे. लॉकडाऊन मध्ये थोड्या फार प्रमाणात शिथीलता आली असली तरी या भागातील पर्यटन हंगाम बंद असल्याने पैसे भरणार कुठून हा यक्ष प्रश्न व्यावसायिकांना समोर उभा आहे या विषयी विद्युत आधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले त्यामध्ये व्यावसायिकांच्या खालील काही मागण्या करण्यात आल्या त्यामधे पर्यटन व्यावसायिकांचे जून २०२१ पर्यतचे थकीत व्यावसायिक व घरगुती लाईटबिल भरण्यासाठी एक वर्षाची मुदत देऊन १२ समान हप्ते मध्ये घेण्यात यावी. कोरोना काळात व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक लाईट बिल वापरलेल्या युनिट चे ५०% पैसे आकारण्यात यावे व अन्य विविध प्रकारची आकारणी रद्द करावी. व्यावसायिकांच्या घरगुती वीजबिला मध्ये वापरलेल्या युनिटचे पैसे आकारण्यात यावेत अन्य विविध प्रकारची आकारणी रद्द करावी. वायरी ते देवबाग तसेच किनारी भागामध्ये कमीदाबाचा वीजपुरवठा होत असतो त्यासाठी ठिकठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत. तसेंच भूमिगत वायर टाकण्यात याव्यात ,वारवांर खंडित होत असलेला विजपुरवठा सुरळीत व्हावा. या विषयी तातडीने लक्ष देण्यात यावे.वादळानंतर तोडमोड झालेल्या व स्थानिकांनी जोडकामास मदत करताना वीजवाहक तारा कोरम झाल्याचे निदर्शनास आले आहेंत॒ ते बदलण्यात यावेत
“”तौक्ते””वादळानंतर महाराष्ट्र शासनाने तत्काळ मजूर केलेल्या भूमिगत विद्युत लाईन चे काम त्वरित करावे यां विषयी भेट घेण्यात आली श्री साखरे यांनी
सदर विषयि आपण आपल्या वरिष्ठाना सादर करुन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले संस्था अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी सर्व विषय मांडले यावेळी श्री रवींद्र खानविलकर, श्री दादा वेंगुर्लेकर, श्री मनोज खोबरेकर, श्री सहदेव साळगावकर, श्री दादा कुबल,श्री श्याम झाड अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.