You are currently viewing २ जुलै पर्यंत छायाचित्रे निवडणूक कार्यक्रम कक्षात व तहसील कार्यालयात सादर करा

२ जुलै पर्यंत छायाचित्रे निवडणूक कार्यक्रम कक्षात व तहसील कार्यालयात सादर करा

अन्यथा मतदार यादीतून नावे वगळण्यात येणार – अरुण खानोलकर

 

दोडामार्ग तालुक्यातील मतदार यांना वेळोवेळी संधी देवून देखील दोडामार्ग तालुक्यात जवळपास ४७७ मतरारांनी मतदार यादीसाठी आपले छायाचित्र सादर केले नाही. या मतदारांनी २ जुलै पर्यंत छायाचित्रे निवडणूक कार्यक्रम कक्षात व तहशीलदार कार्यालय येथे सादर केली नाही. तर त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. तेव्हा तातडीने छायाचित्रे जमा करावी, असे आवाहन दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये जिल्हाधिकारी निवडणूक आयोग विशेष पुननिरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी छायाचित्रे आवश्यक आहे. पण दोडामार्ग तालुक्यातील मतदार यांना कळवून देखील त्यांनी अद्याप कोणतीही छायाचित्रे सादर केले नाही. अशांना शेवटची संधी दिली जात आहे. तरी दोडामार्ग तालुक्यात ज्यांनी मतदार यादी छायाचित्रे सादर केली नाही. त्यांनी तातडीने ती सादर करावी. या बाबत अधिक माहिती ग्रामपंचायत कार्यालय, मंडळ अधिकारी, तहसीलदार कार्यालय, नगरपंचायत, पंचायत समिती येथे माहिती प्रसिद्ध केली आहे. तेव्हा तातडीने छायाचित्रे जमा करावी, असे आवाहन दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी केले आहे. नाहीतर त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा