निळे आभाळ
सुटे बेभान वारा
घामाच्या धारा
क्षणात काळे
झाले आभाळ सारे
सुप्त इशारे
मेघ दाटले
विजांची रोषणाई
ग्वाहीच देई
पाऊस येता
सोसाट्याचा हा वारा,
या जलधारा
बळीराजा तो
होई शेतीत व्यस्त
गारवा मस्त
पेरणी होता
डुले शेत शिवार
हिरवेगार
पाखरे येता
चिवचिवाट सारा
रम्य नजरा
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६