दोडामार्ग
येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रेश्मा नदाफ यांची आज हिरकणी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.यावेळी स्त्रियांवर होणाऱ्या वेगवेगळ्या अन्यायांबाबत उपस्थितांमध्ये चर्चा झाली.दरम्यान यापुढे स्त्रियांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण हिरकणी ग्रुपच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,असा शब्द सौ.नदाफ यांनी दिला.
यावेळी हिरकणी होम रिवाईज एज्युकेशनचा काउंसलिंग सोनम गवस,झोळंबे गावचे उपसरपंच मानसी गवस,पत्रकार संघ जानवी भोसले यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सौ. नदाफ यांचा स्वागतपर सत्कार केला.