कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
शहरवासीयांनी घाबरून न जाता कोविड च्या नियमांचे पालन करण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन
कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन कडील कामत सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये कोविड डेल्टा प्लस चा रुग्ण आढळल्यानंतर नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून तातडीने “त्या” कॉम्प्लेक्समधील पहिल्या टप्यात 76 नागरिकांचे आरटीपीसीआर तपासणीकरिता स्वाब घेण्यात आले होते. हे सर्व स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. त्यामुळे कणकवली शहरवासीयांनी घाबरून न जाता कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी केले आहे. तसेच तो डेल्टा प्लस चा रुग्ण देखील ठणठणीत बरा असून, कणकवली नगरपंचायत, आरोग्य विभागामार्फत सर्व त्या खबरदारीच्या व सतर्कतेच्या उपाय योजना सुरू आहेत. अजून त्या कॉम्प्लेक्समधील 13 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्याचा रिपोर्ट लवकरच येईल. तर काही अजून स्वाब घ्यायचे आहेत. नगरपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांना सहकार्य करा असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.