You are currently viewing ओबीसी समाज राजकीय आरक्षणासाठी उद्या कुडाळात चक्का जाम आंदोलन

ओबीसी समाज राजकीय आरक्षणासाठी उद्या कुडाळात चक्का जाम आंदोलन

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे करणार नेतृत्व; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती

कणकवली

राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकिय नुकसान होणार आहे. तसेच भविष्यात राजकिय आरक्षणाप्रमाणे शैक्षणिक आणि नोकरी मधील आरक्षण देखील रद्द होण्याची शक्यता आहे.त्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्का जाम आंदोलन शनिवार दिनांक 26 जून रोजी सकाळी ठिक 10 कुडाळ येथे होणार आहे,अशी माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

तरी विविध ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याऱ्या ओबीसी नेत्यांनी आपल्या समाजातील लोकप्रतिनिधी, समाज बांधवांसहीत तसेच ओबीसी प्रवर्गातुन निवडुन आलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थेचे प्रतिनिधी यांनी शनिवार दिनांक 26 जून रोजी सकाळी ठिक 10 वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय कुडाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ही जिल्हा बँक संचालक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर,भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर,भाजपा ओबीसी सेल महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते,भाजपा ओबीसी सेल युवक मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश गुरव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा