You are currently viewing मुकेश अंबानींची मोठी घोषणा

मुकेश अंबानींची मोठी घोषणा

भारताला 2G मुक्त करणार

 

देशातील सर्वात मोठ्या कंपनी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनी आगामी काळात उर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता डिजिटल क्षेत्रापाठोपाठ उर्जा क्षेत्रातही रिलायन्स कंपनी सुपरपॉवर होण्याच्या दिशेने पहिले पाऊस पडले आहे. 

 

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, 2016 मध्ये देशाच्या डिजिटल विश्वातील पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही Jio कंपनी सुरु केली. 2021 मध्ये रिलायन्स कंपनी उर्जा क्षेत्रात नवा व्यवसाय सुरु करणार आहे. ग्रीन एनर्जीद्वारे या क्षेत्रात क्रांती आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या 15 वर्षात रिलायन्स ही झिरो कार्बन उत्सर्जन करणारी कंपनी असेल, असा संकल्प यावेळी मुकेश अंबानी यांनी जाहीर केला.

 

Reliance New Energy Council ची ग्रीन एनर्जीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी  स्थापना करण्यात आली आहे. गुजरातच्या जामनगर येथे 5000 एकर जागेवर धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी सुरु आहे. रिलायन्सने 100 GW सौरउर्जेचे उत्पादन करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

 

न्यू मटीरिअम आणि Green Chemicals यासंदर्भातही रिलायन्सकडून विचार सुरु आहे. हायड्रोजन आणि सोलर इको सिस्टीमला सपोर्ट करण्यासाठी रिलायन्सकडून जागतिक दर्जाचा कार्बन फायबर प्लांट विकसि करण्यात येणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले.

 

या बैठकीत रिलायन्सकडून अपेक्षेप्रमाणे 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला. रिलायन्स आणि गुगल यांनी संयुक्तपणे या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 10 सप्टेंबरला हा फोन बाजारपेठेत येईल.

 

हा देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा वेग जास्त असेल. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होतील, असा दावा यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाईल यांनी केला.

 

Jio Phone Next या स्मार्टफोनची किंमती किती असेल, याबाबत रिलायन्सकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपयांच्या आसपास असेल. जिओ-गुगलाच हा अँड्रॉईड स्मार्टफोन गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

 

रिलायन्सच्या AGM बैठकीत मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त करणार असल्याचे सांगितले. 5G इकोसिस्टम विकसित करण्यासाठी बाजारपेठेत 5G ला सपोर्ट करणारी उपकरणे आली पाहिजेत. त्यासाठी रिलायन्स आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत मिळून काम करत आहे. रिलायन्स जिओमुळे भारताला फक्त 5G तंत्रज्ञानच मिळणार नाही तर देश 2G मुक्त होणार असल्याचा दावा मुकेश अंबांनी यांनी केला.

रिलायन्स जिओ हे सध्याच्या घडीला डेटा कन्झन्शनच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. रिलायन्स जिओच्या माध्यमातून दर महिन्याला 630 कोटी जीबी डेटा वापरला जातो. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा