वडा भोवती दोरा फिरवणारी
सत्यवानाची सावित्री सर्वत्र हरली,
स्त्री शिक्षणाची कास धरणारी
जोतिबाचीच सावित्री सतत जिंकली…
चुल आणि मुल सांभाळणारी
पतिनिधनानंतर सती जाणारी
मनुस्मृतीतील असहाय्य ती विरून गेली….
फायटर पायलट उडविणारी,
डॉक्टर बनून
अनेक रुग्णांचे जीव वाचविणारी
जनसामान्यांतील ही रणरागिणीच आता अवतरली
डॉ जयेंद्र परुळेकर
सावंतवाडी