*भक्तीचा भुकेला पांडुरंग*
वेडा रे हा भक्त ! तुझिया नामाचा !!
भुकेला भक्तीचा ! पांडुरंग !!
मुखी तुझे नाम ! टाळ वीणा हाती !!
अभंगची गाती ! भक्तिमार्गे !!
आषाढी कार्तिकी ! जन गोळा होती !!
अभंग गाजती ! विठोबाचे !!
राम कृष्ण हरी ! विठू नाम घेई !!
जयघोष होई ! पंढरीत !!
वैष्णव ते दंग ! विठ्ठल नामात !!
रंगे गुलालात ! वारकरी !!
चंदनाची उटी ! दोन्ही कर कटी !!
पुंडलिक भेटी ! माऊलीये !!
दाही दिशा गर्जे ! पंढरीची किर्ती !!
विठ्ठलाची मूर्ती ! विटेवरी !!
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी