महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांचे वतीने कृषी संजिवनी मोहीम कार्यक्रम दिनांक २१ जून ते ०१ जुलै २०२१ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याकरीता प्रति कृषी सहाय्यक दररोज आपल्या कार्यक्षेत्रातील एका गावात कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रगतशील शेतकरी, कृषी मित्र उपलब्धते नुसार कृषी विभाग जिल्हा परिषद अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ शाश्त्रज्ञ हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.
प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम जसे बीयाणे बीजप्रक्रिया, उगवण शक्ती, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, सुधारीत भात लागवड पध्दती याकरिता आवश्यकतेनुसार मार्गदर्शन,विकेल ते पिकेल बाबत मार्गदर्शन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,पिकविमा योजना क्रुषि विभागाकडील सध्य स्थितीत चालू असलेल्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या कालावधीत शेतकरी शेतीशाळा आयोजन, शेतकऱ्यांकडील नाविन्यपूर्ण उपक्रमा बाबत माहिती इतरांना देणे, इत्यादी उपक्रमाव्दारे कृषी संजिवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील सद्यस्थितीत सतरा कृषी सहाय्यक असुन दररोज या प्रमाणे शेतकऱ्यांचा बांधावर विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
कृषी विभागाकडील कृषी विषयक योजनांच्या अद्यावत माहिती साठी krushi-vibhag.blogspot.com या लिंक चा वापर करावा. किंवा https://www.youtube.com/c/gricultureDepartmentGoM2 असे कृषी विभागाचे यूट्यूब चॅनल असून या चॅनल वरुन विविध कृषी विकासाच्या योजनां व सुधारित तंत्रज्ञान कृषी सल्ला, चित्रफिती प्रसारित केल्या जात आहेत.
तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी ८०१०५५०८७० या क्रमांकावर keywords असा व्हाॅटस्अॅप संदेश पाठवून माहिती घेता येईल, असे तालुका कृषी अधिकारी मालवण श्री.विश्वनाथ गोसावी यांनी सांगितले आहे.