You are currently viewing वेंगुर्लेतील नुतन उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरचे २५ जूनला लोकार्पण – दीपक केसरकर

वेंगुर्लेतील नुतन उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरचे २५ जूनला लोकार्पण – दीपक केसरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन…

वेंगुर्ले

येथील नुतन उपजिल्हा रुग्णालय व कोरोना केअर सेंटरचे उदघाटन शुक्रवारी २५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज सोमवारी दिली.उद्घाटनाच्या या पार्श्वभूमीवर आज आमदार केसरकर व जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी रुग्णालयाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच काही अपूर्ण राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री माने, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, वीज वितरण विभागचे श्री बंड, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी माईणकर- सामंत, डॉ अतुल मुळे, बांधकाम विभाग अभियंता श्री आवटी, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, सचिन देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, नगरसेवक संदेश निकम, नगरसेविका सुमन निकम, शहर समन्वयक विवेक आरोलकर, अभि मांजरेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा