You are currently viewing भुईबावडा घाटात कोसळलेली दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत

भुईबावडा घाटात कोसळलेली दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत

वैभववाडी

गेले दोन दिवस पावसाने उघडीप घेतली असली तर त्यापूर्वी पडलेल्या संततधार पावसाने भुईबावडा घाटातील काही भाग ठिसूळ झाला असून भुईबावडा घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या घाट मार्गाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी पावसामुळे दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला कळताच अधिकारी घाटात दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा