You are currently viewing बाप

बाप

(मुक्तरचना)

आधार निश्चीन्ततेचा..
वटवृक्षाचीच सावली..
साथ शाश्वत निर्भयी..
सोबत सुखदुःखातली..।।

मूक, करडे आभाळ..
सांत्वनी , आधार हात..
फक्त निस्वार्थीच दाता..
जीवनाला सावरणारा..।।

हाच खरा भगवंत जगी..
कृपाळू , कृपावंत सदा..
घडविणारा ,जगविणारा
पुजावा, भजावा अंतरी..।।

©️वि. ग.सातपुते.(भावकवी)
*📞9766544908*

प्रतिक्रिया व्यक्त करा