त्यामुळेच कुडाळात राड्याचा प्रकार; परशुराम उपरकर यांचा आ वैभव नाईक यांना टोला
कणकवली
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना लोकोपयोगी काम करते. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज वर लोकोपयोगी कामे होत आली. मात्र बाहेरून आलेल्या उपऱ्याना शिवसेनेच्या वर्धापन दिनाची व्याख्या समजली नाही आणि त्यामुळेच कुडाळ सारख्या रड्याचा प्रसंग शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आला हे अत्यंत दुर्दैवी आहे असे माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे 100 रुपयात दोन लिटर पेट्रोल व भाजपा सदस्याला एक लिटर मोफत पेट्रोल देण्याचे जाहीर केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त श्री नाईक यांनी अशाप्रकारे उपरोधिक निर्णय घेऊन रडा घालण्यापेक्षा स्वतःच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल द्यायला हवे होते. मात्र तसे न करता कुडाळ येथील दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरून हे पेट्रोल देण्याचे जाहीर करत त्यांनी राड्याचा नवीन पायंडा पाडला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आजवर लोकोपयोगी कामे होतात. आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे काम होण्याची गरज असताना श्री. नाईक यांनी महागाईच्या विरोधातील हे नवे चित्र दाखवून दिले. मात्र वाढलेली महागाई ही केंद्राबरोबरच राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. दोन्ही सरकारांनी महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ते होताना दिसत नाही. मात्र असे असताना कोरोनाच्या काळात वर्धापन दिनाच्या निमित्ताने राडा घालण्यात आला हा दुर्दैवी आहे. कोरोणच्या काळात केंद्र व राज्यातील स्त्ताधर्यानी अशी आंदोलने करणे म्हणजे जनतेच्या पदरात धोंडा देण्याचा प्रकार आहे.
बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना एकदापि मान्य नाही. शिवसेनेने ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली आणि आज आज वर्धापन दिन साजरा केला जातो, त्या मूळ उद्देशालाच फाटा देण्याचा हा प्रयत्न आहे. याउपर्याना शिवसेना कळलीच नाही असे या निमित्ताने म्हणावे लागेल असे श्री उपरकर यांनी म्हटले आहे.