सावंतवाडी :
शिवसेना पक्षाच्या ५५ व्य वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विलगीकरण कक्षांत असणाऱ्या रुग्णांना शिवसेनेतर्फे सॅनिटायजर मास्क, एनर्जी पावडरचे वाटप आज करण्यात आले. हे वाटप शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सावंतवाडी उपशहर प्रमुख अजित सागेलकर, तळवडे ग्रामंपचायत उपसरपंच गजानन जाधव, तळवाडे विभाग प्रमुख विनोद काजरेकर, उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे, तळवडे शाखा प्रमुख अनिल जाधव, युवा सेना शहरअधिकारी विशाल सावंत, शिवसेनिक संजय गवस, ग्रामपंचात सदस्य गोवरेश मेस्त्री, महेश परब, आरोग्यसेवक एस. एस. केरकर, योगेश सावंत तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्तित होते.
शिवसेना पक्षाच्या ५५ व्य वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना तालुका प्रमुक रुपेश राऊळ यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील गरमीने भागातील विलगीकरण कक्ष याना ह्या कोरोना संक्रमण बाधित रुग्ण करीता वस्तू वाटप केल्या. ह्या वस्तू त्या गावाचे सरपंच व आरोग्य कर्मचारी याच्या कडे सुपूर्द केल्या.